विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, वेळापत्रक येथे पहा SSC HSC Timetable 2025

 


SSC HSC Timetable 2025 : नमस्कार मित्रांनो, इयत्ता 10 वी आणि 12 वी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे. की महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्याच्या तारखांमध्ये बदल करण्यात आलेला असून यासंबंधी ही महत्त्वपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत. यंदाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पंधरा दिवस अगोदर घेण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शिक्षण मंडळाने घेतलेला आहे. इयत्ता बारावीची परीक्षा ही 11 फेब्रुवारी 2025 पासून तर इयत्ता दहावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारी 2025 पासून सुरु होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी फक्त पुढील तीन महिन्यांचा कालावधी हातामध्ये उरलेला आहे. त्यामुळे नियोजनबद्ध अभ्यासासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. परीक्षेसाठी अवघ्या तीन महिन्यांचा कालावधी उरला असल्याने विद्यार्थ्यांनी नियोजन करणे हे देखील महत्त्वाचे आहे.



मित्रांनो दहावी आणि बारावीच्या परीक्षा कधी होणार आहेत अशा प्रकारचे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर विचारण्यात येत होता. परंतु दहावी आणि बारावी दोन्ही परीक्षांच्या तारखा ह्या जाहीर करण्यात आलेला असल्याने सध्या या प्रश्नाचे उत्तर मिळत आहे.


दहावी आणि इयत्ता बारावीची परीक्षा ही नेमके विद्यार्थ्यांना खूप चिंतेमध्ये टाकणारी परीक्षा असते. अशा परिस्थितीमध्येच विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेच्या तयारीसाठी आणि स्मरणशक्तीला चालना देण्यासाठी योग्य तयारी करणे देखील आवश्यक ठरत असते. विशेष म्हणजे बारावीच्या विद्यार्थ्यांना तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्यामुळे चांगल्या प्रकारे नियोजन करून अभ्यास करणे हे देखील महत्त्वाचे ठरू शकते

परीक्षा जवळ येत असल्यामुळे पालकांनी देखील त्यांच्या मुलांच्या अभ्यासावरती लक्ष ठेवणे खूप गरजेचे आहे. दहावीच्या परीक्षेचा पहिला पेपर हा मराठी हिंदी आणि प्रथम भाषा या विषयांचा आहे. तसेच यानंतर शालेय शाखांसाठी विज्ञान कला वाणिज्य अशा प्रकारची परीक्षा होणार आहे हे जाहीर करण्यात आलेले आहे.

SSC HSC Timetable 2025 कॉपीमुक्त परीक्षांसाठी विशेष तयारी

या दोन महत्त्वपूर्ण परीक्षांमध्ये परीक्षात गैरप्रकार रोखण्यासाठी सर्वच परीक्षा केंद्र वरती सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. तसेच कॉपीमुक्त परीक्षा करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे देखील जाहीर करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर त्यावरती राज्यभरातील विद्यार्थ्यांकडून काही हरकती देखील प्राप्त करण्यात आलेले आहेत. परंतु त्या किरकोळ असल्याने कडून जाहीर करण्यात आलेले वेळापत्रक हे अंतिमता ठरवण्यात आलेले


परीक्षा 15 दिवस अगोदर का घेणार?

परीक्षा निकाल नंतर जेईई आणि नीट परीक्षेच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ परीक्षेचा तयारी करण्यासाठी मिळावा यासाठी पंधरा दिवस अगोदर घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

त्यामुळे यावर्षीपासून परीक्षेचा निकाल हा पंधरा दिवस अगोदर लागू शकतो अशा प्रकारची माहिती देखील नक्कीच वृत्तवाहिनी मध्ये देण्यात आलेले आहे

पुरवणी परीक्षा घेतल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेश घेण्यासाठी देखील कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. यामुळे परीक्षा लवकर होईल अशा प्रकारची तीन महत्वपूर्ण कारणे देण्यात आलेली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कमी कालावधी उरलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर नियोजन करणे हे देखील महत्त्वाचे आहे.

इयत्ता दहावीचे वेळापत्रक

दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा: तीन ते वीस फेब्रुवारी 2025 दरम्यान

लेखी परीक्षा: 21 फेब्रुवारी पासून ते 18 मार्च 2025 दरम्यान होतील.


इयत्ता बारावीचे वेळापत्रक

बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा :- 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत पार पडणार आहे.

लेखी परीक्षा वेळापत्रक: 11 फेब्रुवारी पासून ते 18 मार्च 2025 दरम्यान होणार आहेत.


अभ्यासाचे नियोजन कसे करावे?

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे बोर्डाची परीक्षा जवळ आलेली असल्याने मोबाईल पासून दूर राहणे महत्त्वाचे आहे. आणि या मोबाईल वापरा संबंधी पालकांचे लक्ष असणे देखील आवश्यक आहे

रात्री उशिरापर्यंत जागरण टाळावे.

तसं तास एकाच ठिकाणी न बसता शरीराला व्यायाम देखील आवश्यक असल्यामुळे दररोज 30 मिनिटे व्यायाम देखील करणे आवश्यक आहे.




Comments

Popular posts from this blog

Ladki Bahan Yojana latest news

नोकरीच्या शोधात आहात समाज कल्याण आयुक्तालयामध्ये काम करण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती

Loan waiver for farmers