Maharashtra Government Formation महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? भाजपाकडून जोरात हालचाली! बुधवार ठरणार निर्णायक
who's next CM of Maharashtra भाजपाने सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची महाराष्ट्र विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. Maharashtra Government Formation : राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, सत्ता स्थापनेसाठी शपथविधीचा सोहळाही ठरला. शपथविधीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाणही ठरलं. पण या दिवशी कोण कोणत्या पदाची शपथ घेणार? मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर कोण बसणार? याबाबत अधिकृत खुलासा झालेला नाही. एकीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री यांची प्रकृती बिघडली असल्याने त्यांनी सर्व बैठका रद्द केल्या आहेत. तर दुसरीकडे अजित पवार चर्चेकरता दिल्लीत गेले आहेत. दरम्यान, ४ डिसेंबरला भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत भाजपाचा विधिमंडळ नेता निवडला जाणार आहे. पीटीआयच्या हवाल्याने टाईम्स नाऊने हे वृत्त दिलं आहे. राज्यात पुढचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आलंय. मात्र, महायुतीतील अंतर्गत वादामुळे हे नाव जाहीर करण्यास उशीर केला जातोय. सत्त...