विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, वेळापत्रक येथे पहा SSC HSC Timetable 2025

SSC HSC Timetable 2025 : नमस्कार मित्रांनो, इयत्ता 10 वी आणि 12 वी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे. की महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्याच्या तारखांमध्ये बदल करण्यात आलेला असून यासंबंधी ही महत्त्वपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत. यंदाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पंधरा दिवस अगोदर घेण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शिक्षण मंडळाने घेतलेला आहे. इयत्ता बारावीची परीक्षा ही 11 फेब्रुवारी 2025 पासून तर इयत्ता दहावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारी 2025 पासून सुरु होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी फक्त पुढील तीन महिन्यांचा कालावधी हातामध्ये उरलेला आहे. त्यामुळे नियोजनबद्ध अभ्यासासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. परीक्षेसाठी अवघ्या तीन महिन्यांचा कालावधी उरला असल्याने विद्यार्थ्यांनी नियोजन करणे हे देखील महत्त्वाचे आहे. मित्रांनो दहावी आणि बारावीच्या परीक्षा कधी होणार आहेत अशा प्रकारचे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर विचारण्यात येत होता. परंतु दहावी आणि बारावी दोन्ही परीक्षांच्या तारखा ह्या...